कादवाच्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

By admin | Published: November 11, 2016 11:24 PM2016-11-11T23:24:23+5:302016-11-11T23:30:17+5:30

कादवाच्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

Launch of Kadwa's 40th Crumble Season | कादवाच्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

कादवाच्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

Next

 दिंडोरी : आज सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघत असताना अत्यंत अडचणीत असलेला कादवा श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहत जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर कादवा दिमाखात सुरू आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा सहकाराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे-पाटील या सहकार धुरिणांबरोबर श्रीराम शेटे यांचे नेतृत्व व कादवाचीही नोंद त्यांना घ्यावी लागेल, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४०व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे होते.
गळीत हंगामाचा शुभारंभ आज वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, सदाशिव शेळके, संजय पडोळ, विलास कड व सर्व संचालक यांच्या हस्ते झाले.
यावेळी गव्हाण पूजन फकीरराव देशमुख, अशोक देशमुख, संजय कोंड, शांताराम पाटील, दिलीप मोकाट यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविकात अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी, मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्याचा ऊस लागवडीवर परिणाम झाला असून, यावर्षी उसाची कमतरता भासू शकते.
यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, संजय पडोळ, विलास कड, भास्कर भगरे, वसंत वाघ, सदाशिव शेळके, संचालक बापूराव पडोळ, सुनील केदार, बाळासाहेब जाधव, त्र्यंबकराव संधान, विश्वनाथ देशमुख, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, शिवाजी बस्ते, संदीप शार्दुल, सौ. शांताबाई पिंगळ, चंद्रकला घडवजे, बापूराव उफाडे, भाऊसाहेब देशमुख, कामगार संचालक सोमनाथ कावळे, फळबाग संघाचे चेअरमन वसंतराव कावळे, कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले, राजेंद्र ढगे आदिंसह सभासद, ऊस उत्पादक, कामगार, अधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी केले, तर आभारप्रदर्शन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले.

Web Title: Launch of Kadwa's 40th Crumble Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.