लालबिंदू बॅग अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:55 AM2019-04-25T00:55:46+5:302019-04-25T00:55:51+5:30
सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून वॉव वुमन समूहाच्या पुढाकाराने वॉव लालबिंदू बॅग अभियानाचा शुभारंभ (रेड डॉट बॅग प्रोजेक्ट) नाशिकमध्ये सुरू केला आहे. अभियानाची सुरुवात वापरलेल्या सॅनेटरी पॅड्सद्वारे होणाऱ्या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी दिशादर्शक उपक्र म म्हणून राबविण्यात येत आहे.
नाशिक : सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून वॉव वुमन समूहाच्या पुढाकाराने वॉव लालबिंदू बॅग अभियानाचा शुभारंभ (रेड डॉट बॅग प्रोजेक्ट) नाशिकमध्ये सुरू केला आहे. अभियानाची सुरुवात वापरलेल्या सॅनेटरी पॅड्सद्वारे होणाऱ्या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी दिशादर्शक उपक्र म म्हणून राबविण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून स्त्रियांची मासिक पाळी हा विषय महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीचा मध्यवर्ती विषय झाला आहे. मासिक पाळीदरम्यान अस्वच्छतमुळे जंतूसंसर्ग झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापासून बचावासाठी बाजारात विविध सॅनेटरी पॅड्स आहेत. जनजागृतीमुळे त्याचा मोठ्या प्रमाणात वापरदेखील होऊ लागला आहे. आता या वाढत्या वापरामुळे सॅनेटरी पॅड्सचा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होऊ लागला आहे. त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे ही काळाची गरज झाली आहे.
सहसा पॅड्स वापरल्यानंतर ते पेपरमध्ये गुंडाळून कचरापेटीत टाकून पुढे घंटागाडीत टाकण्यात येते. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कचरा वेगळा करण्यात मोठ्या प्रमाणात अडचण येते. त्या कचºयाच्या संपर्कात आल्यामुळे सफाई कर्मचाºयांना संसर्गजन्य रोग आदी समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या कचºयाचे वर्गीकरण बरोबर न झाल्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणास हानी पोहोचते. या समस्येवर पर्याय म्हणून नाशिक येथील महिलांच्या वॉव-वुमन आॅफ विस्डम या समूहाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी वॉव लालबिंदू बॅग अभियानाचा शुभारंभ केला आहे. वॉव ग्रुपच्या महिला सभासदांनी एकत्रित येऊन सामाजिक बांधिलकी अंतर्गत हा उपक्र म हाती घेतला आहे. यात महिलांना वापरलेल्या सॅनेटरी पॅड्सची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. वापरलेले पॅड्स पेपरमध्ये गुंडाळून लाल बिंदू मार्क केल्यास त्याचे वर्गीकरण करणे सोपे होते. वॉव ग्रुपद्वारे वॉव लाल बिंदू बॅग महिलांपर्यंत पोहोचविण्यात येईल.