सटाणा : राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ येथील सटाणा दक्षिणभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीअंतर्गत राज्य वखार महामंडळाच्या आवारात बागलाणचे तहसीलदार जितेंद्रइंगळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शाासनाच्या पणन हंगामाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ सटाणा दक्षिण भाग सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सन २०१९-२० रब्बी हंगामासाठी आधारभूत दर निश्चित करण्यात आला असून, प्रतिक्विटंल १७६० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.यासाठी शेतकऱ्यांनी सटाणा सोसायटी कार्यालयात सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक देणे आवश्यक आहे. मका खरेदीसाठी एकरी मर्यादा १२ क्विटंल खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मनोहर देवरे यांनी दिली.मका खरेदी शुभारंभाप्रसंगी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, सहायक निबंधक महेश भंडागे, व्हा. चेअरमन द्वारकाबाई सोनवणे, कृउबाचे माजी सभापती भिका सोनवणे, दक्षिणचे संचालक दौलत सोनवणे, आप्पा नंदाळे, राजेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, दोधा मोरे, पांडुरंग सोनवणे, सचिव सुनील देवरे, कृउबाचे सचिव भास्कर तांबे, प्रदीप सोनवणे, गौरव सोनवणे आदी उपस्थित होते.
सटाणा दक्षिण सोसायटीतर्फे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:41 PM