मनमाडला लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:17+5:302021-02-05T05:50:17+5:30
मनमाड : गेल्या अनेक दिवसांपासून कोविड १९ कोरोना या महामारीच्या सावटाखाली वावरणाऱ्या मनमाडकरांना अखेर प्रतिबंधक लस पोहोचली असून येथील ...
मनमाड : गेल्या अनेक दिवसांपासून कोविड १९ कोरोना या महामारीच्या सावटाखाली वावरणाऱ्या मनमाडकरांना अखेर प्रतिबंधक लस पोहोचली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे शहर असलेले मनमाड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित झाले असून जवळपास ४० जणांचा बळी गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्यानुसार सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरवणे यांनी स्वत: लसीकरण करून घेतले. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून १०० लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून त्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. याप्रसंगी हदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण शिंगी, डॉ रवींद्र मोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, राजेंद्र भाबड, शहरप्रमुख मयूर बोरसे, ॲड. सुधाकर मोरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य दिनेश घुगे, महेंद्र गरुड, अशोक व्यवहारे, मुन्ना दरगुडे, दिनेश केकाण, नगरसेवक विनय आहेर, अज्जूभाई शेख आदींसह मोठ्या संख्येने आशा सेविका, परिचारिका उपस्थित होत्या.
फोटो: २८ मनमाड लसीकरण
मनमाड येथे कोरोना लसीकरण शुभारंभ प्रसंगी उपस्थित डॉ.नरवणे, डॉ प्रवीण शिंगी, डॉ. रवींद्र मोरे आदी.
===Photopath===
280121\28nsk_45_28012021_13.jpg
===Caption===
फोटो: २८ मनमाड लसीकरणमनमाड येथे कोरोना लसीकरण शुभारंभ प्रसंगी उपस्थित डॉ.नरवणे, डॉ प्रवीण शिंगी, डॉ रवींद्र मोरे आदी