उमराणे : येथील जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून लोकसहभागाने उमराणे येथील ब्रिटिशकालीन परसूल धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. यावर्षीही गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी व्ही.एम. इंगळे, बोरसे, बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, माजी सरपंच सुभाष देवरे, सभापती राजेंद्र देवरे, शेतकी संघाचे संचालक संदीप देवरे, रत्नाकर देवरे, बाळासाहेब देवरे, मंडळ अधिकारी बी.व्ही. अहिरराव, तलाठी सुभाष पवार, जयस्वाल, ग्रामसेवक जी.ए. झाल्टे, दहीवडचे सरपंच आदिनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे, दगडू जमधाडे, सुभाष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नंदन देवरे, हेमंत देवरे, चिंतामण देवरे, किरण सोनार, उमेश देवरे, बाळा पवार, अविनाश देवरे, प्रदीप देवरे, तात्या देवरे, सुशील देवरे, सुनील देवरे, दीपक देवरे, सचिन देवरे, आबा देवरे, केदा सोनवणे, दीपक देवरे, रूपेश जाधव, शरद नंदाळे, शिवराजे देवरे, हिरामण देवरे, भाऊसाहेब पाटील, काकाजी पवार, अंबादास मांडवडे उपस्थित होते.धरणाची खोली वाढणारउमराणे येथे सन १८८५ साली ब्रिटिश काळात परसूल धरण बांधलेले आहे. १३२ वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणात ७० चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रातून पाण्याबरोबर हजारो घनमिटर गाळ वाहून आल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता ११८ दलघफूवरून ५८ दलघफुटावर आली आहे. धरणाच्या सुमारे १०० ते १५० एकर संचयक्षेत्रात १५ ते २५ फूट उंचीचा गाळाचा थर साचलेला आहे. ही बाब लक्षात घेऊन सलग पाच वर्षांपासून धरणातील गाळ काढण्याचा उपक्र म जाणता राजा मित्रमंडळाने संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने हाती घेतला आहे.
लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:17 AM