पांढुर्ली उपबाजारात टमाटे लिलावाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:09 PM2019-10-09T23:09:39+5:302019-10-09T23:10:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमी (दसरा) या सणाच्या मुहूर्तावर टमाटा लिलावास सुरुवात करण्यात आली. त्यास पहिल्याच दिवशीच शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमी (दसरा) या सणाच्या मुहूर्तावर टमाटा लिलावास सुरुवात करण्यात आली. त्यास पहिल्याच दिवशीच शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
पहिल्याच दिवशी सुमारे अडीच हजार जाळ्यांची आवक झाली. टमाट्याच्या जाळीस कमीत कमी २५१, तर जास्तीत जास्त रु. ७७१ तर सरासरी ६५१ प्रतिजाळी याप्रमाणे विक्रमी भाव मिळाला.
बाजार समितीचे सचिव विजय विखे यांच्या हस्ते लिलावास प्रारंभ करण्यात आला. लिलाव प्रक्रियेप्रसंगी बाळासाहेब बरकले, रमेश वाजे, सुकदेव वाजे, विष्णुपंत ढोकणे, विकास वाजे, विष्णुपंत वाजे, राजाबापू हगवणे, निवृत्ती हारक, रतन जाधव, सचिन वाजे, हिरामण मंडलिक, भाऊसाहेब दळवी, शिवाजी वाजे, विष्णू हारक, अर्जुन हगवणे, विजय मंडलिक, नितीन बरकले, संतोष पवार आदी उपस्थित होते.
शेतमाल खरेदीसाठी शौकत बागवान, रईस शेख, जब्बारभाई शेख, आसिफ बागवान, शौकत सरदार बागवान, संतोष जोशी, दिलावर बागवान, नाना खरात, निवृत्ती चव्हाणके, अनिल हारक, प्रमोद यादव, कलीम शेख, अन्सारभाई शेख, बापू डांगे हे व्यापारी खरेदीस उपस्थित होते. परिसरातील टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला टमाटे शेतमाल पांढुर्ली उपबाजार येथे दररोज दुपारी २ वाजेपर्यंत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. लिलावासाठी ए.सी. शिंदे, पी.आर. जाधव, आर.जे. डगळे, एस.डी. चव्हाण, ए.बी. भांगरे व एस.के. पवार आदी उपस्थित होते.शेतमालाचा मोबदला त्वरित घ्यावा टमाटा शेतमाल विक्र ीच्या पहिल्याच दिवशी शेतकरी संतू दत्तू पवार यांच्या एकूण १२ जाळीस ७७१ प्रतिजाळी असा उच्चांकी दर मिळाला. बाजार समितीच्या वतीने उपसचिव आर.एन. जाधव यांनी टमाटा खरेदीदार व्यापारी व शेतकरी बांधवांना सोयी सुविधायुक्त मार्केट बनविण्यास समिती कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे शेतकºयांनी आपला शेतमाल निवड व प्रतवारी करून आणावा व शेतमालाची विक्री केल्यानंतर व्यापाºयांकडील मोबदला त्वरित घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.