चांदवड येथे ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ ;जिल्हयात पहिलाच उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:33 PM2018-01-04T16:33:17+5:302018-01-04T16:33:27+5:30
चांदवड- येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हयात हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला.
चांदवड- येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला मोफत लाल रेडीयम लावण्याचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हयात हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यावरील अपघात आणि त्यातून होणारी जीवित व आर्थिक हानी ही भरून निघणारी नसते , सध्या नाशिक जिल्ह्यात कांदा व ऊस वाहतूक सुरू असून ही वाहतूक प्रामुख्याने ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक , पिकउप यातून होत असते. या वाहनांना पाठीमागील बाजूस रेफलेक्टर ( लाल परावर्तीक) नसल्याने मागील बाजूने येणाºया वाहनांना पुढील ट्रॉलीचा अंदाज येत नाही व अपघात होतो .प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना वाहनांना लाल परावर्तीक लावण्याबाबत कळविले होते. त्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड, व्यंकटेश पतसंस्था चांदवड, प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक, अश्वमेध प्रतिष्ठान चांदवड यांनी पुढे येऊन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वाहन रेफलेक्टर लावण्याचा व वाहन चालकांना मार्गदर्शन कार्यक्र म पहिलाच आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्र मास चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, तहसीलदार डॉ.शरद मंडलिक , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे उपस्थित होते.कार्यक्र माची सुरु वात अपघात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून झाली व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक व्यवहारे यांनी स्वत: ट्रॉली ला रेफ्लेक्टर नसल्याने अपघात पहिल्याने संस्थेने सदर कार्यक्र मास सामाजिक बंधिकली जपण्यासाठी व भविष्यातील हानी थांबविण्यासाठी सहयोग करत असल्याचे सांगीतले. तर प्रमुख उपस्थिताचे तालुका व विविध क्षेत्रातील प्रमुख या नात्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून हेल्मेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले हा एक अनोखा प्रयोग होता.