लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्या मालाची आवक घटल्याने बाजारभावतेजीत आले आहेत. सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर १०० रुपये जुडी, तर त्यापाठोपाठ मेथी प्रति जुडीला ७० आणि कांदापातला ४० रुपये आणि शेपू २० रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.ऐन पावसाळ्यात पालेभाज्या बाजार भडकल्याने सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी खिशाला कात्री लागत आहे. गेल्या आठवड्यापासून कोथिंबीर दर टिकून आहे, तर त्यापाठोपाठ आता पालेभाज्या भडकल्याने ग्राहकांना पालेभाज्या खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात २० ते २५ रुपये दर मिळणाºया मेथीच्या भाजीची आवक घटल्याने व त्यातच सध्या मागणी असल्यानेमेथी पाठोपाठ कांदापात आणि शेपू भाजीचे दर तेजीत आले आहे. श्रावणामुळे हिरव्या पालेभाज्यांना मागणी टिकून आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने शेतमालाचे उत्पादन कमी होऊन आवक घटली आहे.