महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:42+5:302021-06-11T04:10:42+5:30
राजपूत समाज संस्थेच्या बैठकीत व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी प्रा. संजीव पवार यांची निवड करण्यात आली आहे. आभासी व्याख्यानमालेचे शुक्रवारी (दि.११) उद्घाटन ...
राजपूत समाज संस्थेच्या बैठकीत व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी प्रा. संजीव पवार यांची निवड करण्यात आली आहे. आभासी व्याख्यानमालेचे शुक्रवारी (दि.११) उद्घाटन माजी पर्यटनमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी सायबर क्राइम या विषयावर मुंबई क्राइम ब्रँचचे पोलीस उपायुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवारी विवेकी पालकत्व या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांचे व्याख्यान आणि अध्यक्षपदी पत्रकार दीप्ती राऊत, रविवारी मेरा भारत महान या विषयावर नायक दीपचंद हे बोलणार असून अध्यक्षपद सेवानिवृत्त प्राचार्य तानसेन जगताप भूषविणार आहेत. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
काळाची गरज ओळखून विविध ज्वलंत सामाजिक प्रश्नावर प्रबोधन व्हावे या हेतूने व्याख्यानमालेसाठी विषय निवडण्यात आले आहेत. व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जयंती अध्यक्ष संजीव पवार, समितीचे अध्यक्ष धर्मा साळुंखे, समन्वयक मिलिंद राजपूत तसेच डी.आर. पाटील, जयदीप राजपूत, दिनेश पाटील, भवाणसिंग सोलंकी, महेंद्र राजपूत, सुनील पवार, किरण खाबिया, नितीन गिरासे, जयदीप पवार, राजेंद्र चौहाण, जयप्रकाश गिरासे, सुनील पवार, रामसिंग बावरी, वीरेंद्रसिंग टिळे, सुनील परदेशी, बबलूसिंग परदेशी आदींनी केले आहे.