चौकट -
अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी शेतकऱ्यांना अधिकृत सावकारांनी वार्षिक ९ टक्के व्याजदराने तारण तर १२ टक्के व्याजदराने विनातारण कर्ज देणे अपेक्षित आहे तर शेतकऱ्यांव्यतिरीक्त इतर व्यक्तींना १५ टक्के दराने तारण आणि १८ टक्के दराने विनातारण कर्ज दिले जाते.
चौकट -
अनधिकृत सावकारी जोरात
जिल्ह्यात अनधिकृत सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून कर्जपुरवठा केला जातो. अनेकांना व्याजदर परवडत नसला तरी गरज भागविण्यासाठी या अनधिकृत सावकारांकडून कर्ज घेतले जात असून यामुळे अनेकजण अडचणीत आले असल्याची उदाहरण जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यात ४४ आत्महत्या
जिल्ह्यात वर्षभरात एकूण ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यातील १३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.