कारसूळ परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:45 PM2020-08-18T22:45:00+5:302020-08-19T00:52:01+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील लोणवडी-कारसूळ रस्त्यावरील मळ्यात घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. यात एक शेळी ठार तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत.

Leopard terror in Karsul area | कारसूळ परिसरात बिबट्याची दहशत

कारसूळ परिसरात बिबट्याची दहशत

Next
ठळक मुद्दे घराजवळ बांधलेल्या शेळींच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : परिसरातील लोणवडी-कारसूळ रस्त्यावरील मळ्यात घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. यात एक शेळी ठार तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत.
जखमाता मंदिराजवळ राहणाऱ्या साहेबराव बागुल यांच्या घराजवळ बांधलेल्या शेळींच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. शेळींच्या आवाजाने बागुल कुटुंबीय जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात एक शेळी ठार झाली तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी कारसूळचे सरपंच रामकृष्ण कंक यांनी केली आहे.रविवारी पहाटे बागुल यांच्या मळ्यातील साहेबराव बागुल यांचा गोठ्यातील शेळींच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. शेळींच्या आवाजाने बागुल कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. यात एक शेळी मृत झाली, तर चार शेळ्या जखमी आहेत. वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. जखमी शेळ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. मागील काही वर्षांपासून शिरूर तालुक्यात बिबट्याचा संचार वाढला असून, पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचा घटना वाढत आहेत.

Web Title: Leopard terror in Karsul area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.