निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे शुक्रवारी आलेल्या बिबट्याला अद्यापही पिंजरा न दिल्याने शेतकरी भयभीत असलेल्यांचे मोहन काकड यांनी सांगितले.दोन दिवसापूर्वी लक्ष्मण काकड यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे शेतात मका पिकात बिबट्या शिरला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ येथे भेट दिली व पाहणी केली व दुसऱ्या दिवशी पिंजरा लावण्याचे सांगितले पण त्यानंतर येथे कुणी अधिकारी फिरकला, ना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला. शनिवारी (दि.८) पहाटे ३ वाजता मोहन काकड यांच्या पुतण्याला शेतात पुन्हा बिबट्या दिसला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामपंचायतीच्या पत्रावर तशी पिंजरा लावण्याची मागणी करा तेव्हाच पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले. यादरम्यान काही अघटित घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार ठरणार, असे मोहन काकड यांनी सांगितले आहे.
निऱ्हाळे येथे बिबट्याचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 9:34 PM
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे शुक्रवारी आलेल्या बिबट्याला अद्यापही पिंजरा न दिल्याने शेतकरी भयभीत असलेल्यांचे मोहन काकड यांनी सांगितले.
ठळक मुद्देवनविभागाचे दर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार