देवळा : तालुक्यात जनता दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना दुष्काळी चटके वन्य प्राण्यांना बसत आहेत. वन्य प्राण्यांची अन्न- पाण्याच्या शोधात जंगल सोडून मानवी वस्त्याकडे भटकंती सुरू झाली आहे. तालुक्यातील सटवाईवाडी येथे दि.४ रोजी गावकऱ्यांना अन्न पाण्याचा शोधात असलेल्या बिबट्याने दर्शन दिल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बाबत पोलीस पाटील कैलास आहिरे व वनविभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील सटवाईवाडी येथे अन्न पाण्याचा शोधात असलेल्या बिबट्याने ठिकठिकाणी काल दर्शन दिले. गावालगत असलेल्या टेकडीवरील पाण्याचा टाकीजवळ, डोन शिवारातील डाळिंबाच्या शेतात विविध ठिकाणी बिबट्या दिसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.या बाबत विलास भामरे यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनपाल डि. पी. गवळी, वनरक्षक एस. टि. आहेर, राकेश गायकवाड आदी अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले त्या जागेची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेली माहिती व पावलांचे ठसे बिबट्याचे असल्याची खात्री वन विभागाच्या अधिकाºयांनी केली. गावकरी व वन विभागाचे अधिकारी यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या मार्गस्थ झाल्याने नंतर आढळून आला नाही. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा वावर असलेल्या जागेवर पाळत ठेऊन आहे.
सटवाईवाडी येथे बिबटया, नागरीकांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 7:15 PM
देवळा : तालुक्यात जनता दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना दुष्काळी चटके वन्य प्राण्यांना बसत आहेत. वन्य प्राण्यांची अन्न- पाण्याच्या शोधात जंगल सोडून मानवी वस्त्याकडे भटकंती सुरू झाली आहे. तालुक्यातील सटवाईवाडी येथे दि.४ रोजी गावकऱ्यांना अन्न पाण्याचा शोधात असलेल्या बिबट्याने दर्शन दिल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्दे बिबट्याने दर्शन दिल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण