दुडगावला बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:34 AM2021-01-08T01:34:34+5:302021-01-08T01:34:55+5:30
शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुडगावामध्ये गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास एक चार वर्षांचा बिबट्या (नर) जेरबंद झाला. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नाशिक : शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुडगावामध्ये गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास एक चार वर्षांचा बिबट्या (नर) जेरबंद झाला. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
त्र्यंबकेश्वर रोडवरील वासाळीगावाच्या जवळ सातपुर वनपरिमंडळात असलेल्या दुडगाव शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात होते. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी अर्जाद्वारे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्याकडे केला होता. त्यानुसार वनपाल ओंकार देशपांडे, वनरक्षक सचिन आहेर, साहेबराव महाजन यांनी मंगळवारी रंगनाथ बेजेकर यांच्या शेताच्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्याने तेथे पिंजरा तैनात करण्यात आला होता.