जळगाव नेऊर : मागील वर्षी बºयाच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले; परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली, जे काही वाचले त्या बागांवर डावणी रोगाने आक्रमक केल्यामुळे बºयाच बागा सगळा खर्च करून सोडून देण्याची वेळ उत्पादकांवर आली. उशिरा छाटलेल्या अतिशय सुंदर आल्या, आता चार पैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कोरोनासारखे संकट उभे राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली,त्यामुळे यावर्षी द्राक्षउत्पादक गेली एक महिन्यापासुन संभ्रमात होते, गेली सात आठ दिवसापासुन पाऊस उघडल्याने व पुढील वातावरणही हवामान तज्ञ चांगले सांगत असल्याने बळीराजाने कोरोनाचे संकट टळू दे,द्राक्ष हंगाम बहरु दे ,असे साकडे घालत द्राक्ष छाटणीला सुरुवात केली आहे .--पावसाने पाने झाली खराबया वर्षातही गेली एक महिनाभर चाललेला रिमझिम पाऊस व सुर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागेची पाने खराब झाल्याने, त्याचा काडी परिपक्वतेवर पारिणाम झाला आहे.मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता यावर्षी शेतक?्यांनी सावध पवित्रा घेत द्राक्ष छाटण्या एक महिना उशिराने घेतली आहे, मागील वर्षी आॅगस्ट सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतक?्यांनी द्राक्ष छाटणी केल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका शेतक?्यांना बसला होता त्यामुळे यावर्षी सावध पवित्रा घेत हवामानानुसार द्राक्ष छाटणी घेतली जात आहे*******मागील वर्षी ब?र्याच द्राक्षउत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले, परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरणे तसेच डावुणी रोगाने आक्रमक केल्यामुळे बागा सगळा खर्च करून सोडुन देण्याची वेळ आली होती. त्यामुळे यंदा पावसाने उघडीप दिल्यानंतर छाटणीचे नियोजन केले आहे.बाबासाहेब शिंदे (द्राक्षउत्पादक शेतकरी. जळगाव नेऊर)--------------------जळगाव नेऊर येथे द्राक्ष छाटणीला वेग आला असून छाटलेल्या रानात पेस्ट करताना मजूर बांधव.(३०जळगावनेऊर)(३०बाबासाहेब शिंदे)