नाशिक : हार्मनी द आर्ट गॅलरीतर्फे रविवारी (दि.१४) गंगापूररोड येथे चित्रकार अशोक धिवरे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुरलीधर रोकडे हे होते.प्रदर्शनात चित्रसाक्षरता करण्यासाठी वृत्तपत्र लेखातील चित्र, नदीचे घाट, बाजार, पर्यटन स्थळे, जुने वाडे, गाव, मंदिरे, गोदाघाट असे विविध चित्र प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच ५० वर्षांपूर्वी एखाद्या स्थळाचे काढलेले चित्र व त्याच स्थळाचे या काळात काढलेले चित्र शेजारी लावून तेथे झालेला बदल चित्रामधून दर्शविण्यात आला.ज्याप्रमाणे धावण्याची मॅरेथॉन असते तशीच चित्रकलेची मॅरेथॉन शहरात सुरू झाली पाहिजे, असे प्रतिपादन चित्रकार मुक्ता बालिगा यांनी यावेळी बोलताना केले. त्याचबरोबर चित्रकार संजय देवधर, आनंद सोनार, बाळ नगरकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी चित्रकार अशोक धिवरे, हार्मनी द आर्ट गॅलरीचे संचालक राजा पाटेकर, बाळ नगरकर व चित्ररसिक उपस्थित होते.
चित्रकलेचे मॅरेथॉन सुरू करूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:25 AM
हार्मनी द आर्ट गॅलरीतर्फे रविवारी (दि.१४) गंगापूररोड येथे चित्रकार अशोक धिवरे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुरलीधर रोकडे हे होते.
ठळक मुद्देमुक्ता बालिगा : निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन