नाशिकरोडच्या कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 01:38 AM2021-06-05T01:38:35+5:302021-06-05T01:39:15+5:30
शहरातील दोन रुग्णालयांपाठोपाठ महापालिकेने नाशिकरोड येथील केअर ॲण्ड क्युअर या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय म्हणून असलेला परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आणखी एका खासगी रुग्णालयाला दणका देण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील दोन रुग्णालयांपाठोपाठ महापालिकेने नाशिकरोड येथील केअर ॲण्ड क्युअर या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय म्हणून असलेला परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आणखी एका खासगी रुग्णालयाला दणका देण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात गंगापूर रोडवरील मेडिसीटी आणि पंचवटीतील रामालयम रुग्णालयाचा परवाना रद्द केला आहे. त्याचवेळी नाशिकरोडच्या केअर ॲण्ड क्युअर रुग्णालयाचादेखील परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. शासन नियमानुसार रुग्णालयात ८० टक्के रुग्ण हे महापालिकेच्या आरक्षित कोट्यातून भरून त्यानुसार यांच्याकडून फी आकारणी करणे बंधनकारक आहे.
nसंबंधित रुग्णालयांकडून महापालिकेच्या ऑडिटर्सला कच्ची बिलेच देण्यात येत होते. बिले तपासून ती नियमानुसार आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठीच महापालिकेने ऑडिटर्स नियुक्त केले असताना त्यांनाच टाळाटाळ करण्यात आल्याचे महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बी.जी. सोनकांबळे यांनी सांगितले.
nपक्की बिले न देता साध्या कागदावरच बिले देणे तसेच बिले तपासणीसाठी न देणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. रुग्णांचे उपचार पूर्ण करून त्यांना घरी जाऊ द्यावे; प्रलंबित रुग्णांची बिले सादर करावीत, असे आदेशही या रुग्णालयाला देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.