नाशिक : इंदिरानगर मधील जिल्हा परिषद कॉलनीतील भानुदास शौचे यांच्या घरामागे असलेल्या आंब्याच्या झाडावर नायलॉन मांज्याला जंगली पारवा अडकल्याचे लक्षात आल्यावर शौचे यांनी त्वरित फायर ब्रिगेड शी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर फायर ब्रिगेडच्या राहुल गुंजाळ यांनी शक्कल लढवत मोठ्या काठीला ब्लेड लावून दोरा कापून पक्षाला सोडवण्यात यश मिळवले. यांनतर खाली पडताना पारव्याला अलगद झेलण्यात आले. दोरा मोकळा होताच पारव्याने पंख फडफडणे चालू केले त्याचवेळी फायर ब्रिगेडच्या कर्मचाºर्यांनी अलगदपणे पारव्याला पाणी पाजले. हा प्रकार बघण्यासाठी येथील विवेकानंद शाळेतील मुलांनी व नागरिकांनी पारवा वाचल्याच्या आनंदात जल्लोष केला. यावेळी नायलॉन मांज्यामुळे पशुपक्षांना व नागरिकांना होणाऱ्या जखमांची गंभीरता सगळ्यांनी बोलून दाखवली. यावेळी फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊन त्यांच्या ताब्यात पारवा देण्यात आला. यावेळी फायर ब्रिगेड कर्मचारी गुंजाळ यांचा उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नायलॉन मांज्यामध्ये अडकलेल्या पारव्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 2:11 PM
फायर ब्रिगेडच्या राहुल गुंजाळ यांनी शक्कल लढवत मोठ्या काठीला ब्लेड लावून दोरा कापून पक्षाला सोडवण्यात यश मिळवले
ठळक मुद्देआंब्याच्या झाडावर नायलॉन मांज्याला जंगली पारवाफायर ब्रिगेड शी संपर्क साधून माहिती दिलीमोठ्या काठीला ब्लेड लावून दोरा कापून पक्षाला सोडवण्यात यश मिळवले