याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यात असलेल्या विहिरीत त्यांच्याच शेतात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या सुनील सोना गांगुर्डे (४२) या व्यक्तीने अचानकपणे दुपारच्या सुमारास विहिरीजवळ जात कठड्यावरून विहिरीत उडी घेतली. यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी गांगुर्डे हे पाण्यात पडलेले होते आणि विद्युत पंपाच्या पाइपचा आधार घेत, तरंगत असल्याचे दिसून आले. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिलरी. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्रप्रमुख लीडिंग फायरमन देविदास चंद्रमोरे, फायरमन प्रमोद लहामगे, जगदीश देशमुख, सुनील शिलावट, रवी आमले आणि बंबचालक नंदू व्यवहारे यांनी सर्व साधनसामुग्रीसह तत्काळ काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. विहिरीत पडलेले गांगुर्डे यांना बाहेर काढण्यासाठी जवानांनी सर्वप्रथम विहिरीत ॲल्युमिनियमची मोठी शिडी व दोरखंड सोडला. विहिरीजवळ जमलेले रहिवाशी, तसेच जवानांनी गांगुर्डे यांना शिडीच्या साहाय्याने बाहेर येण्यास वारंवार सांगितले. मात्र, ते पाइप सोडून येण्यास धजावत नव्हते. यामुळे काही जवान विहिरीत उतरले आणि त्यांनी गांगुर्डे यांच्या कमरेला दोरखंड बांधून शिडीवरून सुखरूपपणे बाहेर काढले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर जवानांना त्यांना रेस्क्यू करण्यास यश आले.
-----
फोटो आर वर ११फायर१/२ नावाने सेव्ह आहे.