पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:19 PM2020-07-07T23:19:22+5:302020-07-07T23:19:37+5:30
नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरूच होता. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सूर्यप्रकाश गायब झाला आणि ढगाळ हवामान तयार झाले.
नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरूच होता. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सूर्यप्रकाश गायब झाला आणि ढगाळ हवामान तयार झाले. संध्याकाळपर्यंत शहरात ५.४ मिलीमीटर, तर गंगापूर धरणाच्या परिसरात २२ मिलीमीटर इतका पाऊस झाला. आज सकाळपासून धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर दिवसभर कायम होता.
मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत हलक्या सरींचा वर्षाव शहर व परिसरात होत आहे. पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर का होईना हजेरी लावल्याने समाधानाचे वातावरण आहे.
---------------------
शहराच्या आजूबाजूला डोळ्यांना हिरवाई नजरेस पडू लागली आहे. डोंगरमाथ्यांवर विविधप्रकारच्या वनस्पतींनाही बहर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने भात लावणीलाही वेग आला आहे.