धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:54 PM2020-07-06T17:54:57+5:302020-07-06T17:56:47+5:30

सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला.

Light showers throughout the day in the city | धरणक्षेत्रांत जोरदार; शहरात दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देआकाशात ढगांची गर्दी अन् हलक्या सरींची हजेरीगंगापूर धरणसाठा ४५.९१ टक्के इतका झाला

नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस शहरात मोजला गेला तर मागील २४ तासांत १८ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान कायम होते. दिवसभर नाशिकककरांना अवघे काही मिनिटेच सुर्यदर्शन घडले. अधुनमधुन पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव कायम राहिला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाची रिपरिप नागरिकांनी अनुभवली. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. तसेच रविवारी मध्यरात्रीपासूनच शहरात वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा अधिक वाढल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. वारे वेगाने वाहू लागल्याने दिवसभर आकाशात ढगांची गर्दी अन् हलक्या सरींची हजेरी सुरू राहिली.
मुंबईच्या समुद्रकिना-यावर वा-याचा वेग वाढला असून दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला.
--इन्फो--
गंगापूर धरण समुहात झालेला पाऊस असा
गंगापूर धरण समुहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी दिवसभरही पावसाच्या कधी हलक्या तर कधी मध्यम सरींचा वर्षाव या भागात सुरूच होता.
गंगापूर-४०मिमी
अंबोली-४५ मिमी
काश्यपी-१५ मिमी
गौतमी-२९ मिमी इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात मोजण्यात आला. यामुळे गंगापूर धरणात नव्याने ५१ दलघफू इतक्या पाऊसपाण्याची आवक झाली. सध्या धरणसाठा ४५.९१ टक्के इतका झाला आहे.
 

Web Title: Light showers throughout the day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.