चांदवड तालुक्यात रविवारी रात्रीच्या वादळी वाºयासह जोरदार पाऊसामुळे वीज व्यवस्था कोलमडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 04:39 PM2018-11-05T16:39:31+5:302018-11-05T16:42:27+5:30
चांदवड : चांदवड तालुका व शहरात काल रविवारी सुमारे दोन तास जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर या वादळी वाºयामुळे झालेल्या पावसाने वीज व्यवस्था पुर्णपणे कोलमडली तर सुमारे १२ तास विजपुरवठा खंडीत झाला होता.
चांदवड : चांदवड तालुका व शहरात काल रविवारी सुमारे दोन तास जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर या वादळी वाºयामुळे झालेल्या पावसाने वीज व्यवस्था पुर्णपणे कोलमडली तर सुमारे १२ तास विजपुरवठा खंडीत झाला होता. रात्रभर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी मधुसूदन वाढे, उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज अधिकारी व कर्मचाºयांनी सदरचा वीज पुरवठा सुरळीत प्रयत्न केला.चांदवड तालुक्यात वादळी वाºयासह जोराचा पाऊस यामुळे वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला त्यात १३२ केव्ही. रानवड उपकेंद्रातून निघालेले ३३ केव्ही फिडर एकुण सहा ब्रेकडाऊन अवस्थेत झाले. बहुतांश तालुका अंधारात गेला. घरगुती ,वाणिज्य, औद्योगिक तसेच शेतीपंप बहुतांश ग्राहकांना १२ तासांपासून विद्युत पुरवठा मिळाला नाही.वरिष्ठ अधिकारी व कर्मचाºयासह सर्वजण लाईनवर हजर झाले व संपूर्ण रात्रभर व सोमवारी पूर्ण दिवसभर काम करून जागून लाईट पूर्वावस्थेत करण्यासाठी प्रयत्न चालू होते.
विजांच्या कडकडाटामुळे बहुतांशी ठिकाणी डिस्क पंक्चर झाले, पीन इन्सुलेटर पंक्चर झाले, तसेच बहुतांश ठिकाणी कंडक्टर तुटून पडले.११ के व्ही.पोल, एल टि पोल तुटून पडले, तारा तुटल्या .तर चांदवड तालुक्यातील बहुतांश उपकेंद्रामध्ये लाईट नव्हती.अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन सप्लाय पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण ठिकाणचा सप्लाय पूर्ववत झाला. चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी झालेले लाइन फॉल्ट काढण्यासाठी मटेरियल पोचविण्यासाठी जाणारी गाडीची व्यवस्था तात्काळ करण्यात आल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.
रविवारी झालेल्या वादळी वाºयामुळे व प्रचंड अशा विजांच्या कडकडाटामुळे महावितरण कंपनीच्या लाईनचे खूप नुकसान झालेले आहे. ३३ के व्ही, ११ के व्ही. लाइनचे कंडक्टर व पोल भरपूर ठिकाणी तुटून पडल्याचे आढळून आल्यावर सर्व कर्मचाºयांनी दिवसरात्र मेहनत घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. गेल्या २४ तासांपासून सर्व अभियंते व वीज तंत्रज्ञ हे लाईनवर काम करून विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते.अंधारात विविध ठिकाणी झालेले लाइन फॉल्ट काढण्यासाठी मटेरियल पोहचविण्यासाठी जाणारी गाडीची व्यवस्था तात्काळ करण्यात आली. तर उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांना प्रचंड ताप १०२ असूनही ते देखील सर्व गोष्टी बाजूला ठेवून लाईन चालू करण्यासाठी तात्काळ हजर झाले तर चांदवड शहरात देखील बहुतांश ठिकाणी पोल पडलेले असल्याने बहुतांश भाग अंधारात होता.
- मधुसूदन वाडे, कार्यकारी अभियंता,