ग्रामीण-शहरी मतदारांमधील दुहीचा युतीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:37 AM2019-05-27T00:37:58+5:302019-05-27T00:38:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालात शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेतकरी संपासारखी ...

 Links to rural and urban voters benefit | ग्रामीण-शहरी मतदारांमधील दुहीचा युतीला फायदा

ग्रामीण-शहरी मतदारांमधील दुहीचा युतीला फायदा

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालात शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेतकरी संपासारखी आंदोलने झाली. त्यातून शहरवासीयांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलनानंतरही शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे आपोआपच शहरवासीयांना स्वस्तात भाजीपाला मिळाला. या काळात शहरी आणि ग्रामीण अशी दुही निर्माण झाली होती. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसून आले. शहरी मतदारांनी युतीला दिलेली साथ दिली असून, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी मतदारांमधील या दुहीचा फायदा युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी निश्चितच फायदा झाला आहे.
सतराव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आणि शेतीचे प्रश्न महत्त्वाचे होते. परंतु, देश संरक्षणाच्या मुद्द्यांसमोर मतदारांनी सर्व प्रश्न बाजूला ठेवून देशाला भक्कम सरकार देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाला पसंती दिली. शिवाय राज्य सरकारने दिलेल्या सशर्त कर्जमाफीचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला. शिवाय शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी न देता त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सरकारचा विचारही अनेक शेतकºयांना पटला. त्यामुळे देशाचे संरक्षण आणि भक्कम सरकार देण्याची क्षमता याचा विचार करून ग्रामीण भागातून मतदाने झाल्याचे दिसून आले. यात एकीकडे शहरी ग्रामीण भागातील दुहीमुळे आणि देश संरक्षणाच्या मुद्द्यावर सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदांसह देवळाली छावनी परिषद क्षेत्र आणि नाशिक महानगरपालिक  क्षेत्रातील शहरी मतदारांनी युतीला पसंती दिलेली असताना दुसरीकडे ग्रामीण भागातही मोदींच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवल्याचे दिसून आले. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करून इतर प्रश्नांकडून मतदारांचे लक्ष वळवले. शेतकºयांच्या बाबतीतही हेच घडले. त्यांनीही देश संरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला पसंती दिल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात शेतीवर उदर निर्वाह करणाºया लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहे. या तरुणांनाही रोजगार आणि शेतीच्या प्रश्नांपेक्षा देश भक्ती आणि देशप्रेम हे मुद्दे अधिक भावल्याने तरुणांनी मोंदीच्या आवाहानाला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शिवाय राज्यात आणि देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात विरोधक एकत्रित येऊ शकले नाही. त्यामुळे विखुरलेल्या विरोधकांना या निवडणुकीत एनडीएला भक्कम पर्याय देण्यात अपयश आले. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातही दिसून आली. युतीच्या उमेदवारांविरोधात आघाडीतील घटकपक्षांमध्ये एकसंघता दिसून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने एकत्र आल्याचे सुरुवातीपासूनच दिसले नाही. शेतकरी व ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी आश्वासक संवाद साधण्यात आघाडीला अपयश आले.
तानाजी गायधनी

Web Title:  Links to rural and urban voters benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.