वावी येथे युवकांकडून हरणाच्या पाडसाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:53 PM2019-01-29T17:53:08+5:302019-01-29T17:53:25+5:30
सिन्नर : तालुक्यातील वावी-शहा रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पाडसाला वाचवून जीवनदान दिल्याची घटना घडली. वावी-शहा रस्त्यालगत ज्ञानेश्वर तुळशीराम शेळके यांची शेती आहे.
सिन्नर : तालुक्यातील वावी-शहा रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पाडसाला वाचवून जीवनदान दिल्याची घटना घडली.
वावी-शहा रस्त्यालगत ज्ञानेश्वर तुळशीराम शेळके यांची शेती आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुत्रे हरणाच्या पाडसाचा पाठलाग करीत असल्याचे शेळके यांना दिसले. त्यांनी त्यांचे बंधू अनिल शेळके यांच्या मदतीने कुत्र्यांपासून हरणाच्या पाडसाला वाचविले. जखमी पाडसाला वावी येथील पशुवैद्यकीय दवाखन्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले. पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश पवार, डॉ. सागर घेगडमल, अशोक देसाई यांनी प्रथम उपचार केल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. हरणाच्या पाडसाला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.