नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या मंगळवारपासून सलग नाशिक शहरासह जिल्ह्यात बारा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने आज नाशिक शहरातील बाजारपेठेत तोबा गर्दी झाली आहे. शहरातील मेन रोड, रविवार कारंजा, पंचवटी , नाशिकरोड येथील वास्को चौक, सिडकोच्या सावता नगर, पवन नगर, सातपूर गाव परिसरात नागरिकांनी भल्या सकाळपासून किराणा दुकान, भाजीपाला हातगाड्या तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. नागरिकांनी एकच गर्दी केल्याने सर्वत्र जमावबंदी तसेच कोरोना नियम पायदळी तुडविल्याचे चित्र आहे तर नागरिकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले.
सिडको भागात 'सोशल डिस्टंसिंग'चा फज्जा
नाशिक जिल्ह्यात बुधवार (दि.12) पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने मंगळवारी सकाळपासूनच किराणा दुकान तसेच भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. राज्य सरकारने बुधवारपासून दहा दिवसांचा म्हणजेच येत्या 22 मेपर्यंत मेडिकल वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देत कडकडीत बंद करण्याचे निर्देश दिले आहे. दहा दिवस कडकडीत बंद असल्याने सिडको भागातील नागरिकांनी मंगळवारी सकाळपासूनच किराणा दुकान तसेच भाजी बाजार मध्ये गर्दी केली होती. जुने सिडको येथील भाजी बाजार हा मुख्य रस्ता असलेल्या लेखानागर ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यालगत भरलेला होता.
याठिकाणी सिडकोसह इंदिरानगर अंबड व परिसरातील नागरिक भाजीपाला घेण्यासाठी येत असतात .याच ठिकाणी फळविक्रेत्यांनाही हात गाडी लावण्यात येत असल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पवननगर भाजी मार्केट तसेच त्रिमूर्ती चौक बाजारात दिसून आला जुने सिडको हनुमान चौक येथील दुकान तसेच रेशन दुकानात नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले. नागरिकांची गर्दी बघता दुकानदार नाही आवरले कठीण होत असल्याने चित्र बघावयास मिळाले दुर्गा नगर येथील पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगतच फळविक्रेते भाजीपाला व्यवसाय व्यवसाय करत असल्याने या ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर देखील कोळंबी याचे दिसून आले