लोहोणेरला दहा दिवसात ७८ बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 09:19 PM2021-04-07T21:19:09+5:302021-04-08T00:55:13+5:30
लोहोणेर : नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दहा दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ७८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

लोहोणेर परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. बेफिकीरपणे वागणाऱ्या नागरिकांमुळेच संसर्गात वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याची मागणी होऊ लागली आहे. गेल्या दहा दिवसात लोहोणेर गावात ६७ व वसाका येथील ११ अशा ७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शासकीय आदेशानुसार सायंकाळी सात वाजेपर्यत काही व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश असतांनासुद्धा एक तास उशिरा म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत येथील काही दुकाने बिनबोभाटपणे सुरु असतात. कोरोनाची लांबत झालेली साखळी खंडित करण्यासाठी गावातील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद करायला हवेत तसेच मास्क न वापरणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.