सर्व्हेवाचक संख्या
5,47,000लोकमत
67,000लोकमत (शिक्षण आधार)
4,55,000दिव्य मराठी
60,000सकाळ
नाशिक : ‘महाराष्टÑाचा मानबिंदू’ ‘लोकमत’ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रांत देशात द्वितीय, तर महाराष्टÑात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला असतानाच नाशिक जिल्ह्यातही गौरवपूर्ण पहिला क्रमांक अबाधित ठेवला. ‘लोकमत’ची नाशिक जिल्ह्यातील वाचकसंख्या तब्बल ५.४७ लाखांवर पोहोचली असून, शिक्षण आधारची वाचकसंख्या ०.६७ लाखावर गेली आहे.इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) या नामांकित संस्थेने केलेल्या २०१७ च्या वाचक सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यानुसार, नाशिक, खांदेशसह महाराष्टÑ पादाक्रांत करून देशाच्या राजधानीत दमदार पदार्पण करणाºया ‘लोकमत’ची एकूण वाचकसंख्या तब्बल १ कोटी ८० लाख ६६ हजार झाली असून, निकटच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्राच्या वाचक संख्येपेक्षा ती कितीतरी अधिक आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहोचलेला ‘लोकमत’ लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.बातमी - मग ती जिल्ह्याची असो, महाराष्टÑाची असो, देशाची असो, विदेशाची असो की ब्रह्मांडाची असो, सर्वप्रथम आणि विश्वासार्हरीत्या देणार ‘लोकमत’च. याच विश्वासामुळे ‘लोकमत’ एकेक शिखर पादाक्रांत करीत आहे . धार्मीक श्रध्दा व आस्थेचा कुंभेमळा असो की विकासाच्या वाटेवर वेगाने निघालेल्या नाशिकचे नागरी प्रश्न, लोकमतने अग्रक्रमाने मांडले. कांदा, द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न असोत की समृध्दीबाधीतांचे , लोकमतने नेहमी आक्रमक भूमिका घेतली. साहित्य, संस्कृती, शिक्षण, क्रिडा, उद्योग आदी सर्वच क्षेत्रांच्या वार्तांकनात‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे.