पोलीस, तक्रारदारांवर कॅमेºयाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:40 AM2018-01-22T00:40:06+5:302018-01-22T00:40:29+5:30
पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असतात. आता पोलीस ठाण्यातील हा सारा प्रकार उघड होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच कॅमेरा असून, तो तक्रारदार आणि पोलिसांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.
संजय शहाणे ।
इंदिरानगर : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असतात. आता पोलीस ठाण्यातील हा सारा प्रकार उघड होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच कॅमेरा असून, तो तक्रारदार आणि पोलिसांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. पोलीस ठाण्यात पोलीस आणि तक्रारदार यांच्याविषयी बºयाचदा वादाचे प्रसंग उभे राहतात. गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार पोलीस सर्वसामान्यांशी वागत असतात. कित्येकदा पोलिसांना मोठ्या आवाजात बोलावे लागते, तर अनेकदा पोलीस तक्रारदाराचे ऐकूनही घेत नाहीत. सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात आला की तो गांगरून जातो. पोलीस त्यास अधिकच घाबरून सोडतात. हे आजवर केवळ बोलले जाते. परंतु आता या साºया बाबींवर कॅमेºयाची नजर राहणार असून, कोण कुणाशी कसा वागतो यावर कॅमेºयाची नजर राहणार आहे. यातून अनेक बाबींचा खुलासा तर होईलच पोलिसांच्या वर्तणुकीत थोडाफार संयम येऊ शकेल अशीही अपेक्षा बाळगली जात आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावर असलेल्या संगणकाजवळच हा कॅमेरा लावण्यात आला असून, हा ९० डीग्री कोनात फिरत असल्याने सर्व हालचालींवर या कॅमेºयाचे लक्ष असणार आहे. पोलीस ठाण्यातील अपप्रवृत्तींना यामुळे आळा बसलेच शिवाय एक चांगले कार्यसंस्कृतीलाही यामुळे सुरुवात होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ तक्रादाराला होणार आहे. भयभीत अवस्थेत आलेल्या तक्रारदाराशी पोलीस संयमाने वागल्यानंतर दिलासा मिळणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात कॅमेरे
पोलीस आणि तक्रारदार यांच्यातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारा हा कॅमेरा शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात लावण्यात येणार आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याची सुरुवात झालेली आहे. सदर कॅमेºयात केवळ हालचालीच नव्हे तर आवाजही रेकॉर्ड होणार आहे. या कॅमेºयामुळे पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीत पारदर्शकता येणार असून, पोलीस आणि तक्रारदार यांच्यात सामंजस्यांनी विचारविनिमय शक्य होणार आहे. समन्यायातून पोलीस, सर्वसामान्यांचे संबंध सुधारावेत हादेखील यामागचा उद्देश आहे.