लग्नाच्या सततच्या तगाद्यामुळे प्रियकराकडून प्रेयसीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 07:12 PM2019-11-25T19:12:34+5:302019-11-25T19:13:24+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथे प्रेयसीकडून लग्नासाठी कायम तगादा होत असल्याने वैतागलेल्या प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली. हा खून चुलत्याच्या मदतीने केल्याची केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित प्रियकर व त्याच्या चुलत्याला घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथे प्रेयसीकडून लग्नासाठी कायम तगादा होत असल्याने वैतागलेल्या प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली. हा खून चुलत्याच्या मदतीने केल्याची केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित प्रियकर व त्याच्या चुलत्याला घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीसांनी दिलेली माहीती अशी की, इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणारी सविता सनु पारधी घटस्फोटामुळे माहेरी दरेवाडी येथे राहत होती. येथील दीपक चिमा गिरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यातच या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीपक याचे वय कमी असल्याने वर्षभरानंतर लग्न करण्याचे ठरवले होते.
दरम्यान दि. १३ नोव्हेंबर रोजी सविता पारधी ही अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातलगांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तीचा कोठेही तपास लागला नाही. त्यामुळे तिच्या आई वडीलांनी ती बेपत्ता असल्याची तक्र ार इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.
रविवारी भाम धरणाच्या वरील बाजूस एका निर्जन स्थळी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला असून त्याबाबतची माहिती स्थानिक नागरीकांनी घोटी पोलीसांना दिली. पोलीसांनी सखोल तपास केल्यावर सदरचा मृतदेह दरेवाडी येथील बेपत्ता असलेल्या सविता हिचा असल्याचे निष्पन झाले.
याबाबत घोटी पोलिसांनी संशयित म्हणून दीपक चीमा गिरे व त्याचा चुलता पूना सोमा गिरे यांना ताब्यात घेतले. त्यांनी सविता हिच्याकडून होणारा लग्नाचा तगादा सहन न झाल्याने तसेच या लग्नाला घरातुनही विरोध असल्याने तिला दगडाने ठेचुन मारून तिचा मृतदेह दुचाकीवरु न निर्जन स्थळी फेकून दिल्याची कबूली दिली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक शिर्मष्ठा वालावलकर यांच्यासह प्रभारी उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, इगतपुरीचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. अप्पर अधीक्षक श्रीमती वालावलकर यांनी तपासकामी उपयुक्त सूचना दिल्या असुन घोटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंदा माळी, हवालदार धर्मराज पारधी, शीतल गायकवाड, लहू सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
(फोटो २५ खून)
मयत महिलेचा फोटो.