लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : दूध दरप्रश्नी महायुतीच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारचा निषेध करत महायुतीतील भाजपा, रासप, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्र ांतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-मनमाड रोडवरील तांदुळवाडी फाटा येथे महाएल्गार आंदोलन केले.महाविकास आघाडीच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा निषेध करत महामार्गावरील वाहनचालकांना मोफत दूधाचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारने दुधाला ३० रु पये प्रती लिटर भाव द्यावा, गायीच्या दुधाला सरसकट १० रु पये प्रती लिटर अनुदान द्यावे तसेच दूध भुक्टीला निर्यातीसाठी ५० रु पये अनुदान द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.सदर आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, रयत क्र ांतीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, माजी उप जिल्हाध्यक्ष प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापुसाहेब गाडेकर, कुणाल क्षिरसागर, राधेश्याम परदेशी, वस्त्रोद्योगचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष कुदन हजारे, संतोष काटे, बाबु खानापुरे, विनोद बोराडे तसेच शेतकरी उपस्थित होते.
दूध दरप्रश्नी महायुतीचे महाएल्गार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 5:46 PM
येवला : दूध दरप्रश्नी महायुतीच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारचा निषेध करत महायुतीतील भाजपा, रासप, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्र ांतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-मनमाड रोडवरील तांदुळवाडी फाटा येथे महाएल्गार आंदोलन केले.
ठळक मुद्देमहामार्गावरील वाहनचालकांना मोफत दूधाचे वाटप करण्यात आले.