बाजार समितीवर ‘महिलाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:05 AM2018-06-22T00:05:57+5:302018-06-22T00:05:57+5:30
सटाणा : संपूर्ण कसमादेचे लक्ष लागून असलेल्या येथील बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत राजकीय पुढाऱ्यांना झुगारून सामाजिक कार्यात पुढाकार घेणाºया व्यक्तींच्या हातात बाजार समितीच्या चाव्या दिल्या आहेत. सभापतिपदी प्रथमच मंगला प्रवीण सोनवणे यांच्या रूपाने महिला विराजमान झाल्या आहेत, तर उपसभापतिपदी सामान्य शेतकरी सरदारसिंग जाधव यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सुरुवातीपासूनच तब्बल चौदा संचालकांनी सभापतिपदासाठी मंगला सोनवणे यांच्या नावाला पसंती दिल्याने अखेरच्या क्षणी विरोधकांनीही नांग्या टाकल्या. त्यामुळे सभापतिपदासाठी सौ. सोनवणे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना प्रभाकर रौंदळ सूचक, तर पंकज ठाकरे यांनी अनुमोदन दिले. उपसभापतिपदासाठी दºहाणे येथील सरदारसिंह जावबा जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपरोक्त पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भंडारे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सभापती सौ. सोनवणे व उपसभापती जाधव यांचा
शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वडिलांचा वारसाबाजार समितीच्या इतिहासात सभापतिपदावर प्रथमच मंगला सोनवणे यांच्या रूपाने एका महिलेला संधी मिळाली आहे. याच पदावर गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी सौ. सोनवणे यांचे वडील पंडितराव भामरे विराजमान झाले होते. राजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाल्यामुळे आणि सासरे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बी. एन. सोनवणे यांच्या समाजकार्याची जोड असल्यामुळे मंगलाताई गेल्या दहा वर्षांपासून ग्राहक सहकारी संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. नामपूरला सभापतिपदी भाऊसाहेब भामरे, उपसभापतिपदी पवारनामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकनियुक्त संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची होऊन सभापतिपदी भडाणे येथील भाऊसाहेब राजाराम भामरे यांची, तर उपसभापतिपदी आनंदपूर येथील लक्ष्मणराव उत्तम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भामरे व पवार या दोघांची निवड म्हणजे एका सर्वसामान्य कुटुंबाला व हाडाच्या शेतकºयांला बहुमान आहे. निवडणूक जाहीर झाली अन् अनेक दिग्गज गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज होते. मात्र लोकनियुक्त निवडीमुळे अनेकांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला, तर अनेक भाग्यवानांना बिनविरोध निवडीमुळे बाजार समितीचे द्वार खुले झाले. आजच्या निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत प्रवीण महाजन यांनी काम पाहिले.