मालेगाव- राष्ट्र सेवा दल मालेगाव आयोजित अभिनव शिव उत्सव राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कोकाटे यांनी उर्दू भाषिक मुलींना ऐकण्यासाठी इतर भाषिक मोठ्या संख्येने येतात तेव्हा भाषिक एकता सामाजिक एकता दिसून येते. मालेगावाचे हेच वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. यावेळी शिवछत्रपती महाराजांच्या चित्र प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली होती. आफरीन गुफरान व मुकर्रमीन मुस्तफा या उर्दू भाषिक विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. या दोन्ही विद्यार्थिनींचा सेवा दला तर्फे सत्कार करण्यात आला. कोकाटे यांची राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचा मालेगाव केंद्रा तर्फे जेष्ठ सेवा दल सैनिक सुनील वडगे व जावीद अहमद यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्र सेवा दल मालेगाव तर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. प्रास्ताविक नचिकेत कोळपकर यांनी तर रविराज सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रमास यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर साळुंखे, राजेंद्र दिघे, प्रवीण वाणी, राजीव वडगे, ॲड. सोमदत्त मुंजवाडकर, बापू जाधव, काशिनाथ डोईफोडे, मनोज चव्हाण, सोहेल डालरीया, स्वाती वाणी, बळवंत अहिरे, योगेश देशावरे, संतोष करंजकर, संजय निकम यांचेसह सेवा दल सैनिक उपस्थित होते.
--------------
निबंध स्पर्धा विजेते :
प्राथमिक गट: प्रथम: यज्ञेश बोरसे
द्वितीय: अंजली जाधव, तृतीय:आदीती तागडे
माध्यमिक गट: प्रथम: निर्जला पगारे., द्वितीय:तेजस्विनी पगारे, तृतीय: यशश्री चौधरी.
स्पर्धेचे परिक्षण कविता मंडळ यांनी केले.
-------