नाशिक : दोन महिन्यात शेतक-यांकडून सुमारे साडेतीन कोटी रूपयांच्या कांद्याची खरेदी करून बांग्लादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सुर्यवंशी हे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतक-यांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिका-यांना साकडे घातले आहे.नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले असून, काही बाजार समित्यांनी यापुढे फक्त रोखीनेच व्यवहार करण्याची सक्ती व्यापा-यांना केली आहे. मालेगाव तालुक्यातील शिवाजी सुर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला. सुमारे साडेतीन कोटी रूपये शेतक-यांना देणे असताना सुर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापा-याला सदरचा कांदा पाठविला. परंतु तेथून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले असून, अद्यापही तेथून परत आलेले नसल्याचे व त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणे आहे. शेतक-यांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रूपये वसुल करून शेतक-यांना वाटप केले. परंतु तरिही अन्य शेतक-यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भिती बाजार समितीला वाटू लागली आहे. त्यामुळे सुर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकिची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून ठेवलेली आहे. तर त्यांचे जामीनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्विकारली असल्याने त्यांच्या उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. या दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसिलदारांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु निव्वळ मालमत्तेवर बोजा चढवून शेतक-यांची रक्कम वसुल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सुर्यवंशी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी या संदर्भात दोन दिवसांपुर्वी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.
मालेगावचा व्यापारी बांग्लादेशात बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:56 PM
नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले
ठळक मुद्देमालेगावच्या व्यापाऱ्याची मालमत्ता लिलाव करणारशेतक-यांची रक्कम थकली : व्यापारी बांग्लादेशला बेपत्ता