मालेगावी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:40 PM2021-07-05T18:40:25+5:302021-07-05T18:41:01+5:30
मालेगाव : कोरोना काळात मानधन तत्त्वावर काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे व नवीन स्वच्छता ठेका रद्द करावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. यावेळी सहायक आयुक्त अनिल पारखे, उपायुक्त राहुल पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राज्याच्या नगरविकास विभागाने कंत्राटी व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, असे पत्र दिले आहे; मात्र कोरोना काळात जिवाची पर्वा न करता शहरात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले. यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. नव्याने दिलेला स्वच्छतेचा ठेका रद्द करावा, मानधनवरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे, संजय जगताप, सुनील अहिरे, युवराज वाघ, शशिकांत पवार, राजू धिवरे, सिद्धार्थ उशिरे, मुकेश खैरनार, सतीश मगरे, संदीप पवार, योगेश निकम आदींसह पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
बहुजन समाजवादी पार्टीचे निवेदन सादर
महापालिकेने नव्याने दिलेला स्वच्छता ठेक्याला प्रशासनाकडून मंजुरी घेतली आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी बहुजन समाजवार्दी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा उपायुक्त राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. १४ वित्त आयोगातून खर्च करण्यासाठी शासनाकडून मान्यता घेतली आहे का, असे निवेदन बहुजन समाज पार्टीचे आनंद आढाव, रफीक सिद्दिकी, संतोष शिंदे, सुनील पवार यांनी दिली आहे.