मालेगावी किसान सभेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:56 PM2019-02-06T22:56:05+5:302019-02-06T22:59:25+5:30

मालेगाव : तालुक्यातील राजमाने, वनपट, डोंगराळे, पोहाणे येथील वनजमीन आदिवासी कसत असताना वनविभागाकडून चाऱ्या करण्याचे काम सुरू असून, सदर काम बंद करावे, वनजमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढावेत, वनअधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने येथील उपविभागीय वनकार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Malegaon Kisan Sabha rally | मालेगावी किसान सभेचे धरणे आंदोलन

उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Next
ठळक मुद्देनिवेदन : वनजमिनींचे दावे निकाली काढण्याची मागणी

मालेगाव : तालुक्यातील राजमाने, वनपट, डोंगराळे, पोहाणे येथील वनजमीन आदिवासी कसत असताना वनविभागाकडून चाऱ्या करण्याचे काम सुरू असून, सदर काम बंद करावे, वनजमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढावेत, वनअधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने येथील उपविभागीय वनकार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वनदावे प्रलंबित आहेत. अशा दावेदारांच्या ताब्यातील प्लॉटवर वनविभागाकडून चाºया केल्या जात आहे, खड्डे खोदले जात आहे.
उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी उपविभागीय वनअधिकारी येडलावार, तालुका वनअधिकारी व्ही.डी. कांबळे यांनी सदर मागण्या शासन स्तरावरच्या असून, याबाबत शासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, उत्तम कडू, हिराशंकर चौधरी, हनुमंत गुंजाळ, दिनेश पवार, चिंतामण गावित, शब्बीर सय्यद, शफिक अहमद, राजाराम अहिरे, मधुकर सोनवणे, रवि पवार, शांताराम दळवी, देवचंद सोनवणे आदींसह आदिवासी समाजबांधव, महिला सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्या...अस्ताणे व मोहपाडा येथील अतिक्रमणधारकांवरील दावा मागे घ्यावा. राजमाने, वनपट, डोंगराळे, पोहाणे वहिवाटीतील प्लॉटमध्ये चाºया करण्याचे काम बंद करावे. तालुक्यातील वनजमिनीधारकास हातपंप, विहीर, पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्रास देळ नये. वनअधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी. यासह इतर मागण्यांप्रश्नी किसान सभेच्या पदाधिकाºयांनी बुधवारी (दि.६) कॅम्प रस्त्यावरील वनविभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले.

Web Title: Malegaon Kisan Sabha rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.