मालेगावी व्यापारी प्रतिष्ठाने 'कुलूपबंद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:12 PM2021-05-12T23:12:16+5:302021-05-13T00:40:05+5:30
मालेगाव कॅम्प : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला कॅम्प भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व मुख्य रस्त्यांवरील व्यापारी प्रतिष्ठाने 'कुलूपबंद' झाली होती.
मालेगाव कॅम्प : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला कॅम्प भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व मुख्य रस्त्यांवरील व्यापारी प्रतिष्ठाने 'कुलूपबंद' झाली होती.
दुपारी बारा वाजेनंतर रस्त्यांवर प्रक्रिया सुरू झाली. यात संगमेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मोसम पूल चौक, एकात्मता चौक, करवा हॉस्पिटल, मोची कॉर्नर, सटाणा नाका, रावळगाव नाका, कॅम्प भागातील काही मुख्य रस्त्यांवर लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या व सुसाट धावणाऱ्या वाहनांना काहीसा ब्रेक लावण्यात आला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. या रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेतील हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल दुकाने सुरू असल्याने नागरिकांची गर्दी दिसून आली, तर काही ठिकाणी जादा संख्येने पोलीस फौजफाटा तैनात होता. कॅम्प रस्त्यावरील मनपाचे प्रभाग कार्यालय, न्यायालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोलीस कवायत मैदान, महाविद्यालय आदी परिसरात शुकशुकाट दिसून आला, तर पोलीस कवायत मैदानासह काही वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.