मालेगाव, नांदगावने ओलांडली सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:53+5:302021-09-14T04:16:53+5:30
इन्फो उत्तरा नक्षत्राला प्रारंभ पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांना झोडपून काढले. सोमवारी (दि. १३) दुपारी ३ ...
इन्फो
उत्तरा नक्षत्राला प्रारंभ
पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांना झोडपून काढले. सोमवारी (दि. १३) दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्याने उत्तरा नक्षत्रात प्रवेश केला असून, त्याचे वाहनही पर्जन्यसूचन म्हैस आहे. त्यामुळे या नक्षत्रात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दि. १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता पंचांगकर्त्यांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला आहे तर काही ठिकाणी पिके झोपली गेल्याने अडचणी वाढल्या आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे व मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
इन्फो
जलसाठ्यांमध्ये वाढ
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर (९८), आळंदी (१००), पालखेड (९४), वाघाड (८६), भावली (१००), कडवा (९९), नांदूरमधमेश्वर (८२), चणकापूर (९३), हरणबारी (१००), केळझर (१००), नागासाक्या (१००) माणिकपुंज (९६) ही धरणे जवळपास भरली आहेत. ओझरखेड, तिसगाव, भोजापूर या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती अजूनही दयनीय आहे. सर्वात मोठ्या गिरणा धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून, यातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.