वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अधिवेशनात मालेगावच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:47 AM2021-02-05T05:47:56+5:302021-02-05T05:47:56+5:30
अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समितीने सादर केलेला अहवाल तत्काळ स्वीकारून अंमलबजावणी सुरू करावी व वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित ...
अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समितीने सादर केलेला अहवाल तत्काळ स्वीकारून अंमलबजावणी सुरू करावी व वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी करावी यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे संयोजक राकेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस बबनराव वाळके होते. वर्धा जिल्हा संघटनेचे शहर सचिव गजानन मसणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. राज्यात समान कमिशनसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अधिवेशनात मालेगाव शहरातील संघटनेचे उपाध्यक्ष पापा यादव, अशोक नागमोती, रवींद्र कुलकर्णी, नंदलाल गवळी, आदींसह सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
290121\29nsk_25_29012021_13.jpg
===Caption===
वर्धा येथे झालेल्या वृत्तपत्र विक्रेता संघाच्या राज्य अधिवेशनात उपस्थित मालेगाव वृत्तपत्र संघाचे सचिव रवींद्र कुलकर्णी व पदाधिकारी.