मालेगावने लसीकरणाचा गाठला १ लाखाचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 12:05 AM2021-10-24T00:05:17+5:302021-10-24T00:07:04+5:30
मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचा एक लाखाचा टप्पा शनिवारी गाठला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरण मोहीम राबवली आहे. शहरातील विविध केंद्रांद्वारे लसीकरण केले जात आहे.

शनिवारी पहिल्या डोसचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला. शहरातील काही भागात अजूनही कोरोना लसीबाबत उदासीनता दिसून येत आहे. महापालिकेकडून जनजागृती सुरू करण्यात आली आहे. शनिवारी गाठलेल्या एक लाखाच्या टप्प्यामुळे महापालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागात आनंद साजरा करण्यात आला. मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी,आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.