मालेगावी शरद नामदेव दुसाने सुवर्णपेढीचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:23+5:302021-02-26T04:19:23+5:30
मालेगावात या सुवर्णपेढीच्या तीन तर पुणे येथे एक शाखा सुरू आहे. गेल्या त्रेपन्न वर्षांपासून मुख्य शाखा सुरू आहे. शुध्दतेची ...
मालेगावात या सुवर्णपेढीच्या तीन तर पुणे येथे एक शाखा सुरू आहे. गेल्या त्रेपन्न वर्षांपासून मुख्य शाखा सुरू आहे. शुध्दतेची हमी ,ग्राहकांचा विश्वास यावर भर असते. त्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या नवीन शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी खास योजना सुरू केली आहे. यात चांदी, पायल मजुरीवर ऐंशी टक्के सूट, शुध्द चांदीच्या भांडी मजुरीवर पन्नास टक्के सूट, सोने ९१६ हाॅलमार्क दागिने मजुरीवर दहा ते पन्नास टक्के सूट,अस्सल हिरे प्रमाणित दागिने मजुरीवर पन्नास टक्के सूट तर जुने द्या नवीन घ्या, या योजनेत शून्य टक्के घट. ग्राहकांनी जुना २२ कॅरेट दागिना दिल्यास पेढीकडून बिनाघटीचा दागिना मिळणार आहे. सर्वात स्वस्त भाव सर्वात स्वस्त मजुरी याप्रमाणे योजना सर्व अटी, शर्तीसह सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना निश्चित चांगला लाभ मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दुसानेंच्या आलिशान दालनात असंख्य ग्राहकांनी खरेदीसाठी उपस्थिती लावली आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी शरद दुसानेंसह गोकुळ दुसाने, अमोल दुसाने व कर्मचारीवृंद सहभागी झाले होते. ग्राहकांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला असल्याचे अमोल दुसाने यांनी सांगितले. (वा.प्र.)