मालुसरे ट्रस्टचे ‘दीपस्तंभ’ पुरस्कार जाहीर
By admin | Published: January 11, 2015 01:03 AM2015-01-11T01:03:57+5:302015-01-11T01:04:07+5:30
सोमवारी वितरण : शिंगाडे, पवार यांचा समावेश;
नाशिक : येथील कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘दीपस्तंभ’ पुरस्कारांची घोषणा करण्यात
आली. आदिवासी कार्यकर्ते नाथा शिंगाडे, कामगार कार्यकर्ते विजय पवार, पत्रकार प्रशांत पवार यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील लोकमान्य टिळक शिक्षणसंस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या सोमवारी (दि. १२) सायंकाळी ४ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
संस्थेचे विश्वस्त संजय
मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. व्यक्तीला ११
हजार रुपये, तर संस्थेला २५ हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह,
मानपत्र, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
कॉ. मालुसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामगार, कष्टकरी आदिवासी, पत्रकारिता, शिक्षण या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला हा पुरस्कार देऊन गौरवले जाते. यंदा या पुरस्कारासाठी
पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करणारे नाथा शिंगाडे,
जळगाव जिल्ह्यातील कामगार कार्यकर्ते विजय पवार, भटक्या-वंचितांवर लिखाण करणारे पत्रकार प्रशांत पवार यांची निवड झाली आहे.
आदर्श शिक्षण-संस्थेसाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील लोकमान्य टिळक विद्यामंदिराचे (चिखलगाव, ता. दापोली)
राजाराम दांडेकर, रेणू दांडेकर हे स्वीकारतील. सोहळ्यास प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कळवणचे आमदार
जिवा पांडू गावित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. याप्रसंगी विश्वस्त अनुराधा मालुसरे, सुनीता मालुसरे, श्रीधर देशपांडे आदि उपस्थित
होते. (प्रतिनिधी)