युवकांच्या संवेदनशीलतेने मनोरु ग्णाला आधार विंचूर : वर्षभरापासून येथील तीनपाटी परिसरात सुरू होती दीनवाणी गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:33 PM2018-01-06T23:33:18+5:302018-01-07T00:24:56+5:30

विंचूर : येथील तीनपाटी भागात गेल्या वर्षभरापासून फिरणाºया मनोरु ग्णाला अखेर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवऋण संस्थेचा आधार मिळाला.

Manchoora Gana was supported by the sensitivity of the youth: The year started from here in the three- | युवकांच्या संवेदनशीलतेने मनोरु ग्णाला आधार विंचूर : वर्षभरापासून येथील तीनपाटी परिसरात सुरू होती दीनवाणी गुजराण

युवकांच्या संवेदनशीलतेने मनोरु ग्णाला आधार विंचूर : वर्षभरापासून येथील तीनपाटी परिसरात सुरू होती दीनवाणी गुजराण

Next
ठळक मुद्दे११ हजार रुपयांची मदतरु ग्णाला देखभालीची व उपचाराची गरज

विंचूर : येथील तीनपाटी भागात गेल्या वर्षभरापासून फिरणाºया मनोरु ग्णाला अखेर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवऋण संस्थेचा आधार मिळाला असून, विंचूर येथील युवकांनी पुढाकार घेत दाखविलेल्या संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे. येथील कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाºया युवकांनी ११ हजार रुपयांची मदत देत या मनोरुग्णाला शिवऋण संस्थेकडे सुपुर्द करीत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
येथील तीनपाटी भागात वर्षभरापासून एक अज्ञात इसम वाढलेली दाढी, अंगावर कपड्यांच्या चिंधड्या आणि कुणी व्यावसायिकांनी दिलेल्या अन्नावर गुजराण करीत होता. जिल्हा परिषदेच्या शाळेसमारील रस्त्यालगतच त्याचे वास्तव्य असल्याने प्रारंभी लहान मुलांना भीती वाटत असे. मात्र आपल्यातच व्यस्त असलेल्या या मनोरुग्णाचा कुणाला त्रास होत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची दिनचर्या सुरू होती. घरापासून दुरावलेल्या या रु ग्णाला देखभालीची व उपचाराची गरज असल्याने रस्त्याने ये-जा करणारे लोक त्याची केविलवाणी अवस्था बघत होते. येथील कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. भरत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यराज दरेकर, सौरभ साळी, हृषिकेश पानसरे, विकास वाघ, हर्षद वझरे, अक्षय थोरात यांसह कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून अकरा हजार रु पये जमा करत जुन्नरच्या संस्थेकडे देत आर्थिक मदत करीत उपक्रमाला हातभार लावला. गजराज प्रतिष्ठानच्या या सदस्यांच्या संवेदनशीलतेची दखल घेत कर्मवीर विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Manchoora Gana was supported by the sensitivity of the youth: The year started from here in the three-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.