मनमाड : शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आढावा घेतला व सूचना दिल्या. सेंट झेवीयर्स शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या सेंट झेवीयर्स शाळेत ५० बेडचे कोविड सेंटर सुरू असून रेल्वेच्या कम्युनिटी हॉलमध्ये १०० बेड चे सेंटर सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी डी सी एच सी सेंटर सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले असून या बाबद लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोविड सेंटर ला भेट देऊन पाहणी केली. या वेळी प्रांताधिकारी सोपान कासार, मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याने सर्वच अधिकारी उपस्थित होते मात्र दुपारी १ वाजता येणारे जिल्हाधिकारी दुपारी ४ पर्यंत आलेच नाही, त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे जाब विचारून शहराची कैफियत मांडली. प्रांताधिकारी कासार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीयांच्या झालेल्या बैठकीत शिवसेना गटनेते गणेश धात्रक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, शहरप्रमुख मयुर बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, अमजद पठाण,राजेंद्र जाधव, प्रकाश बोधक, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, गुरू निकाळे, विलास आहिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मनमाड कोरोना स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 10:28 PM
मनमाड : शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आढावा घेतला व सूचना दिल्या. सेंट झेवीयर्स शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
ठळक मुद्देविश्रामगृहावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक