मनमाड : केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करत कामकाजात सहभाग घेतला.केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करणारे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांना देण्यात आले. यामध्ये पालिकेतील मयत कामगारांच्या वारसांच्या नोकरीच्या प्रलंबित प्रश्नांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष आनंद औटी, ज्ञानेश्वर उल्हाळे, रवींद्र थोरे, राजेंद्र पानपाटील, शरद बोडके, जितेंद्र केदारे, मिलिंद पुरंदरे, तुषार बोराडे, कैलास जाधव, संजय बहोत, बाबा दराडे, सिदाप्पा नामगवळी, संतोष चव्हाण, किरण कवडे, नवनाथ भवर, संजय गवळी, नंदू म्हस्के, सुरेश राऊत, अंबादास महाले, किशोर व्यवहारे, दीपक पांडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाडला काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:48 PM