मनोरु ग्णांना मिळाला आधार माणुसकीचा ओलावा : ओझरमधील तरुणांचा पुढाकार े परिसरातील वेडसर रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:41 AM2017-12-16T00:41:17+5:302017-12-16T00:41:58+5:30
गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर भटकणाºया मनोरुग्णांना येथील काही तरु णांमुळे आधार मिळाला आहे.
ओझर : गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर भटकणाºया मनोरुग्णांना येथील काही तरु णांमुळे आधार मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवऋण युवा प्रतिष्ठानने या अनाथ, बेघर, बेवारस मनोरुग्णांनाआपलेसे करून घेतले आहे.
काहीजण जन्मत: मनोरुग असतात, तर कित्येक जण ऐन तरुणाईत होतात.परंतु कालांतराने ही रुग्ण गावातील असूनदेखील त्यांच्या वेड्यापणामुळे घरूनच त्यांचे पालकत्व फेटाळून लावले जाते. यातील बहुतेक जण मग मिळेल तिथे राहतात, तर अनेकांना अस्वच्छते मुळे विविध रोग जडतात. तरीदेखील रस्त्यावरून ये-जा करणारे यांना टाळतात. अक्षय बोºहाडे हा अवघा बावीस वर्षांचा असून त्याचे नुकतेच शिवनेरी किल्ल्यावर लग्न झाले. त्याची पत्नी या सर्वांची काळजी घेते तर अक्षय हा कॉम्पुटर रिपेअरिंग चे दुकान चालवून राज्यभर मनोरु ग दत्तक घेण्याचे काम करतो.आतापर्यंत त्याने पुणे अहमदनगर सातारा औरंगाबाद परभणी बेळगाव आदी ठिकाणी जाऊन तेथील बेघर असलेल्या मनोरु ग्णांना गाडीत बसवून पुण्यातील प्रादेशिक मनोरु ग्ण विभागात विविध तपापसण्या करून दत्तक घेतले आहे. कैलास आण िविकी यांना निरोप देताना बाजारपेठेत मोठी गर्दी जमली होती.यावेळी नितीन काळे संतोष कदम प्रकाश महाले राजेंद्र शिंदे आनंद खैरे वैभव कदम आशिष गणोरे पप्पू घोंगे शुभम बोस बाळासाहेब शिंदे विजय दमाले अजय ताडे चेतन कदम आदी उपस्थित होते. हायवे लगत रात्रीचे उघड्यावर झोपणे कित्येक मिहने अंघोळी विना राहणे विचित्र केस वाढलेले यामुळे लहान मुले त्यांना घाबरतात.असेच गावातील कैलास आमले व विकी हे मनोरु ग्ण होते.ओझर मधील त्यांची प्रसिद्धी प्रत्येक नागरिकास माहीत आहे.
कैलास आमले हा मूळ ओझरचाच शैक्षणकि दिवसांमध्ये त्याचा असलेला अव्वालपणा आजही अनेक जण सांगतात परंतु ऐन आयुष्याच्या मुख्यमार्गावर असताना आईवडिलांचे छत्र हरपले भावाचे निधन झाले व कैलास बेघर झाला.गणतिात विशेष प्राविण्य मिळवलेल्या कैलास कधी मनोरु ग्ण झाला हे त्याच्या वर्गातील मित्रांना आजही थक्क करणारे आहे. विकी हा दक्षिण भारतातील असून त्याला व्यविस्थत बोलत येत नाही.परंतु तो देखील बस स्थानक परिसरात वासत्यवास असायचा. ओझर येथील नितीन काळे संतोष कदम प्रकाश महाले आदींनी जुन्नर येथील अक्षय बोर्हाडे याला या संबंधी माहिती दिली. त्याने ताबडतोब ओझर गाठत यांच्या संगोपनाची जबाबदारी घेत त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले.