साकूरच्या शेतकऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:42 PM2021-07-02T16:42:20+5:302021-07-02T16:42:26+5:30

नांदूरवैद्य : महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम राज्यस्तरीय पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भीमा आवारी यांनी गहू पिकांचे उच्चांकी उत्पन्न घेत महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला.

Manuka Tura in the crown of Sakur's farmer | साकूरच्या शेतकऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

साकूरच्या शेतकऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

googlenewsNext

नांदूरवैद्य : महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम राज्यस्तरीय पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भीमा आवारी यांनी गहू पिकांचे उच्चांकी उत्पन्न घेत महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या पिकांचे सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आवारी यांनी महाराष्ट्रातून आदिवासी गटात रब्बी हंगाम २०२०-२१ या वर्षात हेक्टरी ६० क्विंटल १० किलो घेतलेल्या (२१८९) या गहू पिकाच्या उच्चांकी उत्पन्नाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. कृषी क्षेत्रात साकूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्य फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे, सरपंच विनोद आवारी, तसेच तुकाराम सहाणे आदी उपस्थित होते.

Web Title: Manuka Tura in the crown of Sakur's farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक