अनेक ग्रामपंचायती ध्वजस्तंभाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:39 PM2021-01-25T19:39:48+5:302021-01-26T02:18:46+5:30

नांदगाव : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काही ग्रामपंचायतीकडे अद्याप ध्वजस्तंभच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्वातंत्र्याच्या सात दशकात ध्वजारोहणाचे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातल्या शाळेच्या ध्वजस्तंभावर केले असल्याची माहिती उद्विग्न करणारी ठरली आहे.

Many gram panchayats without flagpoles | अनेक ग्रामपंचायती ध्वजस्तंभाविना

अनेक ग्रामपंचायती ध्वजस्तंभाविना

Next
ठळक मुद्देनांदगाव तालुका : शाळेतच होते ध्वजारोहण

नांदगाव : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काही ग्रामपंचायतीकडे अद्याप ध्वजस्तंभच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्वातंत्र्याच्या सात दशकात ध्वजारोहणाचे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातल्या शाळेच्या ध्वजस्तंभावर केले असल्याची माहिती उद्विग्न करणारी ठरली आहे.
एरव्ही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्याचा दंडक असताना शाळेच्या ध्वजस्तंभावर आपल्या हातून झेंडावंदन करवून घेण्याचा सरपंचांचा अट्टाहास व त्यातून उडालेले खटके शिक्षक मंडळीनी अनुभवले आहेत. पळाशी गावात दोन दिवसांपूर्वी ध्वजस्तंभ उभारला असल्याची माहिती आहे. तर अद्यापही काही गावांत ध्वजस्तंभ उभारणीच्या प्रतीक्षेत आहेत. ध्वजसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वजारोहणाचे सर्वसामान्य निकष पाळण्यात कुठे कुचराई झाली तर त्याबाबतीत कायदेशीर कारवाईचा सोपस्कार केला जातो. झेंडा फडकविण्यावरून यापूर्वी मानापमानाचे प्रकार घडलेले आहेत.

ग्रामविकास यंत्रणेची अनास्था
सरपंचाने झेंडा फडकवावा अशी अपेक्षा करणाऱ्या गावपुढाऱ्यांना गावात मात्र हाच ध्वज उभारण्यासाठी साधा ध्वज स्तंभ उभारता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार असूनही त्याबाबत ग्रामविकास यंत्रणा अनास्थेने बघत असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार दिसून येत आहे. माळेगाव व एकवई या दोन गावांत ग्रामपंचायत कार्यालयाकडे ध्वजारोहणासाठी स्तंभ नसल्याची माहिती तालुका पंचायत समितीचे ग्रामविकास विभागाचे विस्तार अधिकारी ढवळे यांनी दिली

Web Title: Many gram panchayats without flagpoles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.