मराठा हायस्कूलचे एनटीएस आणि एनएमएसएस परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:41+5:302021-09-02T04:31:41+5:30
एनएमएमएस परीक्षेत सर्वसामान्य गटात १० विद्यार्थी, त्यात आरंभ सोनवणे जिल्ह्यात ९ वा,सारंग कुऱ्हाडे जिल्ह्यात २३ वा, गौरी लोखंडे जिल्ह्यात ...
एनएमएमएस परीक्षेत सर्वसामान्य गटात १० विद्यार्थी, त्यात आरंभ सोनवणे जिल्ह्यात ९ वा,सारंग कुऱ्हाडे जिल्ह्यात २३ वा, गौरी लोखंडे जिल्ह्यात ५९ वी, चैतन्य पाटील जिल्ह्यात ६४ वा, विवेक गवळी जिल्ह्यात ६८ वा, आसिम शेख जिल्ह्यात ६९ वा, श्वेता महाजन जिल्ह्यात ११६ वी, विवेक शिरसाठ जिल्ह्यात १३७ वा, संकेत लामखेडे जिल्ह्यात १६३ वा, रिया काश्मिरे जिल्ह्यात १८८ वी, तर इतर मागास गटात तीन विद्यार्थी त्यात शिवानी जेऊघाले जिल्ह्यात २३ वी, गोरी क्षीरसागर जिल्ह्यात ३० वी, ओमकार चौधरी जिल्ह्यात ४५ वा क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर शिंदे, तसेच सर्व गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचे विषय शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनटीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्यांचा सत्कार करताना म.वि.प्र. समाजाचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. संजय शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक हरीभाऊ दरेकर, उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक अंबादास मते, मार्गदर्शक शिक्षक आणि सत्कारार्थी विद्यार्थी, आदी उपस्थित होते. (फोटो ०१ मराठा)