त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:16 PM2020-01-19T18:16:58+5:302020-01-19T18:18:10+5:30

लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणज्यि आण िविज्ञान महाविद्यालयात १ ते १५ जानेवारी ...

The Marathi language at Trimbakeshwar College fortnightly | त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्दे पंथरवड्यात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणज्यि आण िविज्ञान महाविद्यालयात १ ते १५ जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या पाशर््वभूमीवर या पंथरवड्यात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती प्राचार्य डॉ.पी. व्ही. रसाळ यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या पंधरवड्यात महाविद्यालयात प्रथम क्र ांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे यांच्या वतीने मुलींसाठी सायबर क्र ाईम या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बेझे येथील युवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. तसेच मराठी विभाग आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते. ग्रंथालयाने या निमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या पंधर वड्याचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आण िनाशिकच्या के टी एच एम महाविद्यालयातील प्रा.डॉ.भास्करराव ढोके, डॉ.सुरेश जाधव यांच्या उदबोधनपर व्याख्यानाने झाला.याप्रसंगी डॉ. ढोके म्हणाले, आपली आई जशी आपल्यासाठी महत्वाची असते, तशीच मातृभाषा देखील आपल्या कर्तृत्वानेच विकिसत होणार असते, प्रख्यात क्रि केटपटू सुनील गावस्कर यांचा एक शब्द इंग्लड मधील वृत्तपत्रांनी बातमीचा मथळा बनवला होता. कर्तृत्ववान व्यक्ती भाषेचे सौंदर्य वाढवतात, म्हणून आपण मोठे व्हा, आपली भाषा आपोआप मोठी होईल, या प्रसंगी डॉ.जाधव यांनी मातृभाषेचे महत्व विशद केले.
या विविध स्पर्धांचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.माधव खालकर, डॉ.अशोक भवर, ग्रंथपाल डॉ.वर्षा जुन्नरे, बाळासाहेब हांडगे यांनी केले.
कार्यक्र म यशस्वीते साठी डॉ.शरद कांबळे, प्रा.मनोहर जोपळे, प्रा.नीता पुणतांबेकर, प्रा.नरेंद्र निकम, डॉ. अजित नगरकर, प्रा.मिलिंद थोरात, प्रा.विनायक पवार, प्रा.शीतल गायकवाड, मयूर कुटे, जाचक, गोटी राम गोसावी, कैलास गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The Marathi language at Trimbakeshwar College fortnightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.