मालेगाव :कोरोना विषाणुच्या संसर्ग टाळण्यासाठी सोयगाव रविवारचे आठवडे बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्याचे नगरसेविका जिजाबाई बच्छाव यांनी पत्रकान्वये कळविले आहे. देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. यासाठी या विषाणुचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सोयगाव येथील रविवार आठवडे बाजार दि.२२ ते २९ मार्च बंद ठेवण्यात आलेला आहे.३१ मार्च पर्यंत रविवार येणारे सोयगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आपला शेतमाल आणू नये तसेच ग्राहकांनी आठवडे बाजारात गर्दी करु नये. वेळोवेळी शासनाने, आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, विषाणु संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये, सर्दी ठिकाणी जावू नये यासाठी सोयगाव परिसरातील नागरिकांनी शासनास व आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन नगरसेविका जिजाबाई बच्छाव, माजी सरपंच डॉ. शरद बच्छाव, दिलीप बच्छाव, पोलीस पाटील कैलास पाटील आदींनी केले आहे. कोरोना विषाणुचे आजारास घाबरु नये नागरिकांनी खबरदारी घ्यावी, स्वच्छता पाळावी, कोरोना आजार बरा देखील होतो, असे पत्रकात म्हटलेआहे.
रविवारचे आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 4:06 PM